अयोध्येतील राम मंदिरला जायचंय; तर लागा 2024 च्या तयारीला, जानेवारीतच मिळणार श्री रामाचं दर्शन

| Updated on: Jan 05, 2023 | 9:59 PM

राहुलबाबा, कान उघडून ऐका, 1 जानेवारी 2024 ला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार होईल. फक्त राम मंदिरच नाही तर एक-दोन वर्ष जाऊ द्या, माँ त्रिपुर सुंदरीचं मंदिरही एवढं भव्य बनवलं जाईल की संपूर्ण जग ते बघायला येईल

त्रिपुरा : देशातील अनेकांना श्री रामाचं मंदिर अयोध्येत व्हावं अस मनापासून वाटतं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि मार्ग ही मोकळा झाला. आता मंदिराच्या बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे देशवासियांना लवकरच अयोध्येत जात श्री रामाचं दर्शन घेता येणार आहे. याबाबत आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली.

त्रिपुरातील एका कार्यक्रमात बोलताना, गृहमंत्री शाह यांनी राम मंदिराच्या उभारणीत काँग्रेसने न्यायालयात अडथळे आणले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि मोदीजींनी भूमीपूजन करून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. जे 1 जानेवारी 2024 ते तयार होईल.

तसेच यावेळी शाह यांनी, राहुल गांधी यांचा राहुलबाबा असा उल्लेख करत ते 2019 च्या लोकसभा निवडणूक वेळी काँग्रेसचे अध्यक्ष तर शाह हे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो हे सांगितलं. तसेच राहूल म्हणायचे, मंदिर तिथेच बांधणार पण तारीख माहित नाही. तर राहुलबाबा, कान उघडून ऐका, 1 जानेवारी 2024 ला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार होईल. फक्त राम मंदिरच नाही तर एक-दोन वर्ष जाऊ द्या, माँ त्रिपुर सुंदरीचं मंदिरही एवढं भव्य बनवलं जाईल की संपूर्ण जग ते बघायला येईल

Published on: Jan 05, 2023 09:59 PM
विठुरायाच्या दान पेटीत चक्क बनावट दागिने, वर्षभरात कोट्यावधी रुपयांचे दानही
Pune News : पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार