सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्रजी, राजीनामा द्या!; फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर
खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
नागपूर : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. “मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेक लोकांना मनाला असं वाटतं मी गृहमंत्री राहलो नाही पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले. या सगळ्यांना एवढंच सांगतो की, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा चार्ज दिला आहे. जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सोडणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Published on: Apr 01, 2023 01:33 PM