Dilip Walse Patil| नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर देशाच्या सरकारने कडक कारवाई करावी -गृहमंत्री

| Updated on: Jun 10, 2022 | 8:15 PM

राज्यात आज जे आंदोलने करण्यात आली ती शांततेने पार पडली आहे. मुस्लिम सामाजाने सहकार्य केले आहे.

Dilip Walse Patil : भाजपच्या (BJP) निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या अटकेची जोरदार मागणी होऊ लागली आहे. तर त्या वक्तव्याविरोधात राज्यात शुक्रवारच्या नमाजनंतर सोलापूर, नाशिकसह औरंगाबाद, परभणीमध्ये मुस्लिम धर्मियांनी (Muslims) तीव्र निषेध केला. तसेच नुपूर शर्मा यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. तर सोलापूर, नाशिकसह, औरंगाबाद, जालना परभणीमध्ये नमाजनंतर शेकडो मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. त्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, राज्यात आज जे आंदोलने करण्यात आली ती शांततेने पार पडली आहे. मुस्लिम सामाजाने सहकार्य केले आहे. तर नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर देशाच्या सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

Published on: Jun 10, 2022 08:15 PM
भाजपाकडून विजयाची जंगी तयारी
Chhagan Bhujbal on Nupur Sharma | नुपूर शर्मांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया