Nagpur Ganapati Visarjan : नागपुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचविले जातात घोडे
नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत घोडे नाचविले जात आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळं गणपतीचा उत्साह साजरा करायला मिळाला नाही. यंदा त्याची कसर भरून काढली जात आहे.
नागपूर : नागपुरात मोठे गणपती विसर्जनासाठी निघायला सुरवात झाली. युवकांचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल ताश्याच्या गजरात तरुणाई थिरकत आहे. घोडे नाचवले जात आहेत. फटाके वाजवत बाप्पाला निरोप दिला जात आहे. युवकांमध्ये मोठा जोश आहे. गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मोठ्या प्रमाणात ढोल, ताशे पथक वाचविले जात आहेत. तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत घोडे नाचविले जात आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळं गणपतीचा उत्साह साजरा करायला मिळाला नाही. यंदा त्याची कसर भरून काढली जात आहे.
Published on: Sep 09, 2022 05:38 PM