अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षांना 15-16 कोटींच्या गाड्या गिफ्ट कशा दिल्या ? अंजली दमानिया यांचा सवाल

| Updated on: Dec 29, 2023 | 10:29 PM

अजित पवार गटाने पक्षाच्या कामासाठी आपल्या जिल्हाध्यक्षांना 80 बोलेरो आणि स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट केल्या आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर टीका करीत यासाठी पैसे कुठून आले अशी विचारणा केली आहे. हा पैसा अजित पवार यांनी दिला की त्यांच्या पक्षांनी दिला. या गोष्टी ईडी किंवा एसीबीला दिसत नाहीत का ? असा सवाल केला आहे.

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना 80 बोलेरो आणि स्कॉर्पिओ गाड्या गिफ्ट देण्यात येणार आहेत. यावरुन सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांनी कुठून आले एवढे पैसे अशी विचारणा केली आहे. त्यानंतर आता शरद पवार गटासह सर्वच पक्षांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. एकूण 80 गाड्या देण्यात येणार आहेत. 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ गाड्याचे गिफ्ट पक्षाच्या कामासाठी दिल्या आहेत. एका स्कॉर्पिओची किंमत साडे चोवीस लाख रुपये तर एका बोलेरोची किंमत 13 लाख रुपये आहे. एवढ्या गाड्यांची किंमत 15-16 कोटी होते. हे पैसे अजित पवार यांनी दिले की त्यांच्या पक्षांनी दिले ? कुठून आले हे पैसे असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी ईडीला हे सर्व आता दिसत नाही का ? असाही सवाल त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांना गाड्यांनी बांधून ठेवण्यासाठी या गाड्या उपयोगी पडतील अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Published on: Dec 29, 2023 10:28 PM
मतदार संघात राहील्या तर सुप्रिया सुळे कमी फरकाने हरतील, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका
सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात 41 लाखांचा ‘सोन्या’ बैल आकर्षणाचं केंद्र