मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ दाव्यानंतर अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार?

| Updated on: Aug 05, 2023 | 9:11 AM

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांना सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानंतर अजित पवार यांना नेमक्या किती आमदारांचं समर्थन आहे? याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत सामील झाले. अजित पवार यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांना सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानंतर अजित पवार यांना सर्वाधिक आमदारांचं समर्थन असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सरकारकडे आधी 170 तर आता 215 आमदारांचं समर्थन असल्याचं काल विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. यानंतर चर्चा सुरु झाली ती अजित पवार यांच्याकडे किती आमदार असल्याची ती. नेमकी ही संख्या किती आहे? यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 05, 2023 08:23 AM
सर्व जिल्हा परिषदांमधील ‘या’ पदांसाठी तब्बल १९ हजाराहून अधिक पदांची जम्बो भरती, गिरीश महाजन म्हणाले…
‘पुण्यात दहीहंडीची वेळ रात्री १० वाजेपर्यंत नाही तर…’, भाजपच्या आमदाराची शिंदे सरकारकडे मागणी काय?