5 राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपाचा किती खर्च?; आकडेवारी आली समोर
काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाला दणदणीत यश देखील मिळाले. आता खर्चाची आकडेवारी देखील समोर आली आहे.
नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये (Election) भाजपाला (BJP) दणदणीत यश देखील मिळाले. मात्र आता या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाने किती खर्च केला या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये एकूण 344.27 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती या अहवालात भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा झालेल्या निवडणुकांवर भाजपाने 58 टक्के अधिक खर्च केला आहे. या खर्चामध्ये नेत्यांचा प्रवास, सार्वजनिक सभा, मिरवणुका, प्रचारांवर झालेला खर्च या प्रमुख खर्चाचा समावेश आहे.
Published on: Sep 22, 2022 10:40 AM