यंदाचा कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?

| Updated on: Sep 07, 2024 | 2:51 PM

कास पठार हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे.हे पठार ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या प्रजातीच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.परंतू यंदा पावसाळा लांबल्याने सप्टेंबरात हंगाम सुरु होत आहे.

Follow us on

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किमी अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा 2012 साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला.यंदाचा पावसाळा लांबल्याने फुलांचा बहर उशीरा सुरु झाला आहे. नीलीमा, अबोली, दीपकांडी, सोनकी, तेरडा अशी शंभर ते दीडशे जातींची फुले कास पठारावर पाहायला मिळतात. कास पठार पाहण्यासाठी पुरुषांसाठी दीडशे रुपये शुक्ल ठेवले आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी 40 रुपये शुल्क आहे. पार्कींगपासून कास पठारापर्यंत वाहनांची सोय करण्यात आली आहे. सध्या येथे चवर फुलली आहे. येथे प्रचंड धुके पसरलेले असते आणि गार वारा सुटलेला असतो. त्यामुळे स्वेटर घालून यावे लागते. तसेच धुक्यामुळे दरीचा भाग दिसत नाही. सदा हरित जंगलात हा विभाग असल्याने येथे बिबटे तसेच अस्वल यांसारखे हिंस्र पशू फिरत असतात. तसेच हा भाग निसरडा असल्याने सावधानता पूर्वक प्रवास आणि पर्यटन करावे असे म्हटले जाते.