पालकमंत्र्यांची किंमत किती ? अवघे ५१ रुपये, कुणी लावले ठिकठिकाणी पोस्टर्स ?

| Updated on: Apr 29, 2023 | 8:54 PM

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. मात्र, शासनाकडून अद्याप योग्य मदत मिळालेली नाही. अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. परिणामी योग्य वेळेत मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

बीड : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. ऐन हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. अशातच सरकारने मदतीचे आश्वासन देऊनही अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यात त्यांना शेतकरी संघटनेचीही साथ मिळाली आहे. बीडमधीलही संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांविरोधात जोरदार पवित्रा घेतला आहे. बीडमध्ये सर्वाधिक नुकसान होऊनही पालकमंत्री अतुल सावे अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांनी साधी विचारपूसही केली नाही आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘पालकमंत्री बेपत्ता आहेत. त्यांना शोधून काढणाऱ्याला 51 रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केलं आहे. तसा आशयाचे पोस्टरदेखील गेवराई तालुक्यात लावण्यात आले आहेत.

Published on: Apr 29, 2023 08:54 PM
राणे कुटुंबाबद्दल अपार करुणा, बुद्धिमत्तेचे कौतुक, सुषमा अंधारे यांचा खोचक टोला
गुलाल, विजयाचा जल्लोष आणि धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर