सरकारमध्येच अजित पवार आल्याने शिंदे गटाची गोची? नाराजी नाट्यही सुरू; अनेक आमदारांत नाराजीचा सुर
2019 नंतर महाविकास आघाडीत अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांच्यावर निधी वाटपावरून याच शिंदे गटातील आमदारांनी टीका केली होती. त्यानंतर शिंदे यांच्याबरोबर जात भाजशी हात मिळवणी करून सत्तांतर घडवून आणलं होतं. तर अजित पवार यांच्यासह मविआलाच सत्तेतून बाहेर केलं होतं.
मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड करत वेगळी चूल मांडली. तर अजित पवार यांच्यांसह 8 एक जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. याचदरम्यान शिंदे गटात मात्र नाराजीच्या सुरासह धुसफूस पहायला मिळत आहे. कारण 2019 नंतर महाविकास आघाडीत अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांच्यावर निधी वाटपावरून याच शिंदे गटातील आमदारांनी टीका केली होती. त्यानंतर शिंदे यांच्याबरोबर जात भाजशी हात मिळवणी करून सत्तांतर घडवून आणलं होतं. तर अजित पवार यांच्यासह मविआलाच सत्तेतून बाहेर केलं होतं. त्यानंतर 3 एक वर्ष शिंदे गटातील आमदार हे अजित पवार यांच्यावर या ना त्या कारणाने टीका करताना दिसत होते. पण आता अजित पवारच सत्तेत गेले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांसह आमदारांना त्यांच्यासोबत जावं लागणार आहे. याच कारणामुळं सत्ताधारी शिंदे गटात धुसफूस पहायला मिळत आहे. तर ज्यांच्याविरोधात बोललो त्यांच्यासोबतच कसं बसायचं? असा सवाल काही आमदारांचा आहे. त्याचबरोबर आता सत्तेतील वाटा ही राष्ट्रवादी काँग्रेसला देताना काही महत्वाची मोठी खाती त्यांना द्यावी लागणार यावरूनही शिंदे गटात नाराजीचा सुर येऊ लागला आहे.