माझ्या मनात काय आहे शिरसाट यांना कसं कळणार, जयंत पाटील यांचा सवाल

| Updated on: Jan 01, 2024 | 4:26 PM

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे मनाने अजित पवार यांच्या सोबतच आहेत. त्यांच्या संभाव्य प्रवेशाने आमचा मंत्रिमंडळ रखडला. ते शरीराने शरद पवारांसोबत आहेत. मनाने ते अजित पवार यांच्यासोबतच आहेत असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यावर जयंत पवार यांनी आपण संजय शिरसाट यांच्यासोबत कधी बोललेलो नाही. त्यांना माझ्या मनातले कसे कळते असा सवाल केला आहे.

कोल्हापूर | 1 जानेवारी 2023 : शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील हे मनाने अजित पवारासोबतच आहेत असे वक्तव्य केले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपला काही संजय शिरसाट यांच्याशी परिचय नाही. किंवा त्यांच्याशी आपण बोलतही नाही तर त्यांना माझ्या मनातले कसे कळणार असा सवाल केला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनाच विचारा मला गरीबाला का विचारता असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. मराठ्यांना टीकणारे आरक्षण द्यायला हवे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत निर्णय घेऊ नये संपूर्ण अभ्यास करुन आरक्षण जाहीर करावे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राम हा सर्वांचा आहे, राम मंदिराच्या उभारणीसाठी जगभरातून पैसा आला होता, परंतू काही जणांकडून त्याचा गैरवापर होत आहे. भाजपा राम मंदिराचा कार्यक्रम पक्षीय कार्यक्रम असल्यासारखे राबवित असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Published on: Jan 01, 2024 04:25 PM
आमच्या 12-12 च्या फॉर्म्युल्यावर ते बोलायला तयार नाहीत, प्रकाश आंबेडकर पाहा काय म्हणाले
Video | रामलल्लासाठी सात दिवसाचे सात रंगाचे कपडे तयार, पाहा कोणावर सोपविली जबाबदारी ?