मराठा आरक्षणाचा चक्रव्यूह सरकार भेदणार तरी कसा? सरकारची झाली कोंडी?

| Updated on: Oct 23, 2023 | 11:35 PM

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले. कुणबी दाखल्याची मागणी केली. तेव्हापासून जरांगेंना OBC नेते आणि OBC महासंघाचा विरोध सुरू झाला. . OBC नेते भुजबळांनीही OBC तुन मराठ्यांना आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलाय. विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांचं म्हणणं आहे की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. OBC तुन नको.

मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांची मागणीला सर्वांत आधी विरोध झाला तो OBC महासंघाकडून. पाटील यांनी दिलेली मुदत आता एक दिवसावर आलीय. त्यामुळे पुन्हा एकदा बबनराव तायवाडे यांनी सरकारला इशारा दिलाय. जरांगे यांच्या दबावाला बळी पडले तर रस्त्यावर उतरू असं OBC महासंघानं म्हटलंय. जरांगे यांची मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले द्या. अर्थात OBC तुन आरक्षण. मात्र. त्याला OBC महासंघाने विरोध केलाय. एवढंच नाही तर OBC महासंघाला सरकारनं पत्र देऊन वायदा केला की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. एक तर OBC बांधव आहेत की ते छाती ठोकून सांगताहेत की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. OBC बांधव आम्ही सोबत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकार चक्रव्यूहात सापडलंय. सरकार हा भेदणार चक्रव्यूह भेदणार तरी कसा? सरकारची कोंडी झालीय का? पाहा टीव्ही9 चा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Oct 23, 2023 11:35 PM
‘गाढव गेलं आणि ब्रम्हचारही गेलं, शिवतीर्थावर शिमगा मेळावा’, मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला
‘हे सिगारेटचे रहस्य सांगाल का?’, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला