लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस, तेरणासह अनेक प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहेत. संततधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरून गेले आहेत.
लातूर, 26 जुलै 2023 | जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहेत. संततधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरून गेले आहेत. यामुळं दुष्काळी लातूर पाण्याचा सुकाळ आल्याचं बोललं जात आहे. औराद शहाजनीं आणि जळकोटमध्ये मोठा पाऊस झाला आहे. तेरणा प्रकल्पातही पाणी साठा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची वनवन करावी लागणार नाही आहे.
Published on: Jul 26, 2023 03:06 PM