Devendra Fadnavis : मविआच्या ठोकशाहीला ठोकशाहीनंच उत्तर देणार

| Updated on: Apr 25, 2022 | 6:16 PM

विरोधी पक्ष भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून त्याच्यावर हल्ला करतात. भ्रष्टाचारविरोधात लढाई सुरू राहील. तर मविआच्या ठोकशाहीला ठोकशाहीनंच उत्तर देऊ

मुंबईः आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले. होय, मारून टाकले. मी तुम्हाला यानिमित्ताने स्पष्टपणे सांगू इच्छितो की, केरळ आणि बंगालमध्ये आमचे शेकडो लोक-कार्यकर्ते मारून टाकले. तरीही आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही संघर्ष केला. हा तर महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. इथे आमची ताकदही तेवढीच आहे. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnis) यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री (CM) आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणीस म्हणाले की, विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायची प्रवृत्ती या सरकारची आहे. सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याकरिता पोलीसांच्या समक्ष हल्ले करणार करतात. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधी नव्हती. विरोधी पक्ष भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून त्याच्यावर हल्ला करतात. भ्रष्टाचारविरोधात लढाई सुरू राहील. तर मविआच्या ठोकशाहीला ठोकशाहीनंच उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Published on: Apr 25, 2022 06:16 PM
Vishwanath Mahadeshwar यांच्यासह शिवसेनेच्या 3 माजी नगरसेवकांनाही अटक
Navneet Rana यांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे 24 तासांत राज्य सरकारकडुन उत्तर देण्याचे निर्देश