पती-पत्नींची 32 वर्षानंतर भेट

| Updated on: Jul 29, 2022 | 8:54 PM

एवढ्या कालखंडात शेषराव काळेंचा कुठेचा शोध लागला नसल्याने त्यांची आम्ही आशाच सोडली होती असंही त्यांचे कुंटुंबीय सांगतात. आता ते बत्तीस वर्षानंतर घरी आल्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला आहे

अमरावतीत 32 वर्षानंतर पती-पत्नीची भेट झाली बत्तीस वर्षापूर्वी पतीच्या मेंदूवर परिणाम झाल्याने घर नवऱ्याने घर सोडल होते. ज्यांनी घर सोडले त्यांचे नाव शेषराव काळे होते, त्यांनी घर सोडल्यानंतर घरच्यानी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांना लग्न झाल्यानंतर दोन मुली झाल्या मात्र मुलींचा सांभाळ करण्यासाठी शेषराव काळेंची पत्नीने आपल्या आईच्या घरी राहून दोन मुलींना वाढवले आणि सासरी येऊन त्या दोन मुलींची लग्नही केली. या एवढ्या कालखंडात शेषराव काळेंचा कुठेचा शोध लागला नसल्याने त्यांची आम्ही आशाच सोडली होती असंही त्यांचे कुंटुंबीय सांगतात. आता ते बत्तीस वर्षानंतर घरी आल्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी त्यांचा सत्कार केला आहे.

Published on: Jul 29, 2022 08:54 PM
साखर कारखान्यांवर धडक कारवाई
संजय राऊत मोठे नेते नाहीत…