मुख्यमंत्री फक्त फोटो काढायला शेतकऱ्यांच्या बांधावर जातात-आदित्य ठाकरे
Aditya Thackeray On CM Ekanth Shinde : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीय. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
हैद्राबाद : ठाकरेगटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे आज हैद्राबाद दौऱ्यावर आहेत. तिथे टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीय. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फोटो काढायला जातात. आतापर्यंत ज्या- ज्या घोषणा झाल्या, त्यातली किती मदत शेतकऱ्यांना मिळाली?, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. खरा मुख्यमंत्री कोण गद्दार की गद्दारी करायला लावणारा?, असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. राजकारणातून ठाकरे परिवाराला भाजपला संपवायचं आहे, असं दिसायला लागलं आहे. भाजपाचा राग हा बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवारावर आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Published on: Apr 11, 2023 03:44 PM