आदित्य ठाकरे आज हैद्राबाद दौऱ्यावर; कोणत्या राजकीय भेटी होणार?
Aditya Thackeray on Daura : आदित्य ठाकरे आज हैद्राबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे तेलंगणाचे मुख्यमंत्री केटी आर राव यांची भेट घेणार आहेत. पाहा व्हीडिओ...
हैद्राबाद : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज हैद्राबाद दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळाआधी त्यांचं बेगमपेठ विमानतळावर आगमन झालं. आदित्य ठाकरे तेलंगणाचे मुख्यमंत्री केटी आर राव यांची भेट घेणार आहेत. तेलंगणात केटी आर राव यांच मोठं प्रस्थ आहे. सध्या नगरविकास मंत्री म्हणूनही ते काम पाहतायेत. तसंच गीतम विद्यापीठात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. गीतम विद्यापीठातर्फे आदित्य ठाकरे यांना युवा राजकारणी म्हणून संवाद कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 11, 2023 10:13 AM