Video : ‘मी मुंबईची मुलगी’ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची डिस्चार्जनंतर गर्जना

| Updated on: May 08, 2022 | 12:15 PM

Navneet Rana on Mumbai : मुंबईत भ्रष्ट्राचाराची लंका असून या लंकेचा ऱ्हास होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. 

मुंबई : मुंबईतील लिलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतरत त्यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मी मुंबईची मुलगी आहे, असं ठणकावून सांगत नवनीत राणा यांनी आपला पुढचा प्लानची यावेळी बोलताना सांगितला. उद्धव ठाकरेंंना यावेळी त्यांनी चॅलेंजही दिलंय. दरम्यान, अयोध्या दौऱ्यावरुन कोण असली कोण नकली, यावरुन त्यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब असली होते, पण आताची शिवसेना नकली आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांचं औक्षण करण्यात आलं. हनुमान चालिसा दाखवून यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबईत भ्रष्ट्राचाराची लंका असून या लंकेचा ऱ्हास होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Video : माझ्याविरोधात लढा आणि जिंकून दाखवा, नवनीत राणा यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 8 May 2022