Dipak Kesarkar: जुन्या आठवणींना दिला उजाळा, शरद पवारांबद्दल मी कधीच अपशब्द वापरले नाहीत- दीपक केसरकर

Dipak Kesarkar: जुन्या आठवणींना दिला उजाळा, शरद पवारांबद्दल मी कधीच अपशब्द वापरले नाहीत- दीपक केसरकर

| Updated on: Jul 15, 2022 | 2:59 PM

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंडखोरी केली होती त्या दरम्यान आमदार दीपक केसरकर (Dipak Kesarkar) हे मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये झळकत होते. याचे कारणही तसेच होते, दीपक केसरकर हे सर्व बंडखोर आमदारांच्या वतीने प्रवक्ता म्हणून समोर आले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली. दीपक केसरकर यांनी आज ‘TV9 मराठी’शी बातचीत […]

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंडखोरी केली होती त्या दरम्यान आमदार दीपक केसरकर (Dipak Kesarkar) हे मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये झळकत होते. याचे कारणही तसेच होते, दीपक केसरकर हे सर्व बंडखोर आमदारांच्या वतीने प्रवक्ता म्हणून समोर आले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली. दीपक केसरकर यांनी आज ‘TV9 मराठी’शी बातचीत केली, मी शरद पवार (Sharad Pawr) यांच्याबद्दल  कधीच अपशब्द वापरले नाही असे ते म्हणाले. माझ्या राजकीय प्रवासात त्यांचे मोठे योगदान असल्याने माझ्या तोंडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणे शक्यच नसल्याचे ते म्हणाले. गुवाहाटीमध्ये असताना बंडखोर आमदारांची भूमिका स्पस्ट करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी माध्यमांशी संपर्क साधला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

Published on: Jul 15, 2022 02:59 PM
Sanjay Raut | औरंगजेब आता अचानक सरकारचा कधीपासून नातेवाईक झाला? नामांतर निर्णय स्थगितीवरुन संजय राऊतांची बोचरी टीका
Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये आताच माईक ओढाओढी सुरु झाली आहे – अजित पवार