मला ‘लव्ह’चा अर्थ… सुप्रिया सुळे म्हणाल्या आणि नितेश राणे यांनी व्यक्त केली भेटण्याची इच्छा, कारण काय?

| Updated on: Feb 06, 2023 | 9:20 AM

मला माझ्या ज्ञानात भर टाकायची आहे. सुप्रिया सुळे यांनी तारीख, वेळ आणि ठिकाण सांगावं मी तिथे त्यांना भेटेन असे नितेश राणे म्हणाले आहेत.

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलीय. मला माझ्या ज्ञानात भर टाकायची आहे. सुप्रिया सुळे यांनी तारीख, वेळ आणि ठिकाण सांगावं मी तिथे त्यांना भेटेन असे नितेश राणे म्हणाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी मला ‘लव्ह’चा अर्थ माहित आहे. मला ‘जिहाद’चा अर्थ माहित आहे. पण, ‘लव्ह जिहाद’चा अर्थ माहित नाही. ऑक्सफर्डच्या कोणत्याही डिक्शनरीत हा शब्द सापडला नाही. कुणाला माहित असल्यास मला त्याचा अर्थ सांगावा. मी चर्चेला तयार आहे असे त्या म्हणाल्या होत्या. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना भेटून लव्ह जिहादचा अर्थ सांगेन, असे म्हटले आहे. हिंदू मुलीवर अत्याचार करून त्यांना कसे बरबाद केले जाते याची माहिती देईन, असे राणे यांनी स्पष्ट केले.

Published on: Feb 06, 2023 09:20 AM
जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; ‘या’ भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
आधी बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, आता राहुल गांधी आणि नाना पटोलेंमध्ये फोनवरून चर्चा