मी नाराजी उघडपणे व्यक्त केली, राज्यसभेचं पराभवाचं खापर माझ्यासह अपक्ष आमदारांवर फोडलं जातंय – देवेंद्र भुयार
महाविकास आघाडीच्या तीन जागा निवडून आल्या तर भाजपच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत किती नाट्यमय पद्धतीने झाली हे सर्वांनी पाहिलं. सकाळपासून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेकांच्या नजरा निवडणुकीकडे लागल्या होत्या. सुरूवातीला महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी मतदान केलं. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेनेनं मतदान केलं. भाजपच्या सगळ्या आमदारांनी मतदान केलं. त्यानंतर दोन्ही बाजूनी मत वाद करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. निर्माण झालेल्या गोंधळामध्ये साधारण आठ तास वेळ गेला. रात्री उशिरा मत मोजणी सुरू झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तीन जागा निवडून आल्या तर भाजपच्या तीन जागा निवडून आल्या आहेत. मी नाराजी उघडपणे व्यक्त केली, राज्यसभेचं पराभवाचं खापर माझ्यासह अपक्ष आमदारांवर फोडलं जातंय असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.