Devendra Fadnavis on Ajit Pawar | ‘अजितदादांविरोधातच षडयंत्र असल्याचं वाटतं’-tv9
कार्यक्रमात अजित पवार आणि पंतप्रधान हे मोकळेपणाने बोलले हे काही लोकांना चांगले वाटलं नाही. तर जाणीवपुर्वक त्या कार्यक्रमाला गालबोट लावले जात आहे.
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलने करण्यात आल्यानंतर सर्वसामान्याला आता असं काय झालं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरले होते, प्रश्न केला जात होता. तर देहूत पार पडलेल्या शीळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक रस्त्यावर येत आंदोलने केली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तर पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी भाषणाला संधी द्यायला हवी होती. असं म्हणत भाजप ने राजकराण केले. तसं व्हायला नको होतं. पण झालं यामुळे माहाराष्ट्राचा अपमान झाल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavi) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, कार्यक्रमात अजित पवार आणि पंतप्रधान हे मोकळेपणाने बोलले हे काही लोकांना चांगले वाटलं नाही. तर जाणीवपुर्वक त्या कार्यक्रमाला गालबोट लावले जात आहे. तर ‘अजितदादांविरोधातच हे षडयंत्र असल्याचं वाटतं’ असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.