Yoshomati Thakur News | काम क्वालिटीचं दिसलं नाही तर डोकं फोडेन, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा अधिकाऱ्याला सज्जड दम

| Updated on: Jul 25, 2022 | 3:35 PM

Yoshomati Thakur News | यशोमती ठाकूर यांनी रस्त्याच्या कामाबाबत हयगय केल्यास अधिकाऱ्यांना दणका देण्याचा सज्जड इशारा दिला.

Yoshomati Thakur News | माजी मंत्री यशोमती ठाकूर (Ex Minister Yoshomati Thakur) यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. काम नीट न केल्यास कारवाईचा इशारा दिला. काम क्वालिटीचं (Quality) दिसलं नाही तर अधिकाऱ्यांना त्यांनी डोकं फोडेन असा इशारा दिला. त्यांची ही व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर (Social Media) लगेच व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये एका रस्त्याच्या कामाच्या उद्धघाटनाचा बोर्ड लागलेला दिसत आहे. त्यावेळी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना (PWD Officers) आपण या कामात पैसे घेतले का? असा सवाल करतात. तसेच या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास डोके फोडण्याचा इशारा (warning) देताना दिसतात. यावर अधिकारी वर्ग काही काळ स्तब्ध होतो. अमरावती जिल्ह्यातील एका ठिकाणी विशेष निधी (Special Funds) अंतर्गत एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना त्यांनी हा इशारा दिला. यशोमती ठाकूर या यापूर्वीच्या ठाकरे सरकारमध्ये मंत्री होत्या. तसेच त्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडिओ सध्या समाज माधम्यावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

VIDEO : अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Manisha Kayande | शिवसंवाद यात्रेमुळेच भाजपला धडकी, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांची टीका