Vasant More | Raj Thackeray यांच्या सभेची माझ्या पद्धतीने मी तयारी करणार
पुण्यातील सभा आमच्यासाठी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. मी माझ्या पद्धतीने तयारी करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिलीय.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)आणि पुण्यातील मनेसेचे नेते वसंत मोरे यांच्यात मशिदींवरील भोंग्यांवरून मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या ठाणे आणि संभाजीनगर सभेला जाणे टाळलं होतं. मात्र आता राज ठाकरे यांची पुण्यात सभा होत असल्याने तिथं आपण हजर राहणार असल्याचे वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले आहे. तसेच पुण्यातील सभेची जोरदार तयारी करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपल्या नाराजीवर भाष्य करताना राज ठाकरेंना भेटल्यावर ती दूर होईल असेही म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वसंत मोरेंचे नाराजी नाट्य सुरु आहे. याबाबत राज ठाकरेंना भेटायचे आहे. त्यांच्याशी भेट झाली की नाराजी (Annoyed) दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वेळी राज ठाकरे जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. या वेळेस मला वेळ दिला होता, मात्र अचानक तब्येत बिघडल्यानं राजसाहेब मुंबईला गेले. पुढच्या वेळेस नक्की वेळ देतील.