डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलींचा वेग कायम; आता पुन्हा बदली? चार महिन्यात तिसरी बदली

| Updated on: Jul 22, 2023 | 8:12 AM

त्यांच्या बदलींचा वेग कायम असून आता चार महिन्यात त्यांची तिसरी बदली झाली आहे. विशेष म्हणजे मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत.

मुंबई | 22 जुलै 2023 : महाराष्ट्रातील डॅशिंग सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यांच्या बदलींचा वेग कायम असून आता चार महिन्यात त्यांची तिसरी बदली झाली आहे. विशेष म्हणजे मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. तर फक्त दीड महिन्यात त्यांची यावेळी बदली झाल्याने याची चर्चा होताना दिसत आहे. तर मुंढे यांची मंत्रालयातील मराठी भाषा विभागातून आता कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली आहे. मुंढे हे मराठी विभागाचे सचिव होते. पण आता बदलीनंतर ते कृषी आणि एडीएफ विभागाचे सचिव असणार आहेत.

Published on: Jul 22, 2023 08:12 AM
अजित पवार सत्तेत सामील; पुत्र पार्थ पाठोपाठ आता पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याची राजकारणात एन्ट्री
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?