जयंत पाटील सत्तेत जाणार? संदीपान भुमरे म्हणतात, म्हणजे ‘मोठं साहेब…’
यासाठी महिन्याभरात दोन वेळा पवार यांची अजित पवार गटाकडून भेट घेण्यात आली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचं उघड झालं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत
औरंगाबाद, 13 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यापासून अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महिन्याभरात दोन वेळा पवार यांची अजित पवार गटाकडून भेट घेण्यात आली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचं उघड झालं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर जयंत पाटील देखील आता शरद पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री संदीपान भुंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे बातम्यांच्या माध्यमातून कळलं. पण ते घरगुती कारणासाठी भेटले असतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर जयंत पाटील हे सत्तेत सहभागी होणार का या प्रश्नावर त्यांनी, जयंत पाटील आमच्याकडे येऊ शकतात. अजित पवार आले तर जयंत पाटील ही येऊ शकतात. आले तर त्यांचं स्वागत आहे, जयंत पाटील आले म्हणजे शरद पवार आल्यासारखेच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.