…अजितदादा फुटले नसते तर सव्वाशे जागा लढवू शकले असते… विजय वडेट्टीवार यांची टिका

| Updated on: Aug 31, 2024 | 6:07 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना विधानसभेच्या जागांसाठी महायुतीत संघर्ष करावा लागत आहे. हे पाहून किव वाटत असल्याचे कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

अजितदादा पवार यांनी विधानसभेच्या 60 जागा लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचे मित्र पक्ष त्यांना छळत आहेत. आम्हाला त्यांची किव येते. निवडणूकी पूर्वी ते 60 वर आले आहेत. जर निवडणूकी वेळी 40 वर येतील अशी टिका कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अजितदादा जर राष्ट्रवादी पक्षात असते तर त्यांनी नक्कीच सवाशे जागा लढल्या असत्या असे कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दोघांनी मिळून अजितदादा पवारांची अवस्था अगदी वाईट करुन ठेवली आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या 60 जागा मागाव्यात आणि पदरात जे पडतेय ते घ्यावे असेही त्यांनी मनोमन ठरलेले दिसतंय असेही कॉंग्रेसचे नेते  विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 31, 2024 06:06 PM
…याचाच अर्थ तुम्ही शुद्ध भावनेने माफी मागितली नाही…तुमच्या मनात…काय म्हणाले राऊत
अजितदादा म्हणताय, ‘मी आता बराच नम्र झालोय अन्…’,गुलाबी मेकओव्हरनंतर राष्ट्रवादीच्या रणनितीत बदल?