Aurangzeb ज्यांचा आदर्श आहे, ते शिवसेनेचा आदर्श होऊ शकत नाही – संजय राऊत

Aurangzeb ज्यांचा आदर्श आहे, ते शिवसेनेचा आदर्श होऊ शकत नाही – संजय राऊत

| Updated on: Mar 19, 2022 | 1:16 PM

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे (Shivsena) आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही.

मुंबई: औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे (Shivsena) आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही. ज्यांची छुपी युती आहे ती त्यांना लखलाभ असो, असं सांगतानाच औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमसोबतच्या (MIM) आघाडीची चर्चा फेटाळून लावली. शिवसेनेने जरी एमआयएमसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Published on: Mar 19, 2022 01:16 PM
Holi Festival : बंजारा समाजासोबत आमदार श्वेता महालेंची धुळवड, पारंपरिक गीतांवर केले नृत्य
Aurangabad Accident | गंगापूर-वैजापूर रोडवर भीषण अपघात, 3 जण जागेवरच ठार