प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान

| Updated on: Sep 30, 2023 | 11:41 PM

पहिल्यांदा आम्ही विचार केला होता, मात्र दुसरा रस्ता निवडला. विश्व गुरूच्या नावाने चार हजार कोटी रुपये या सरकारने दिल्लीत खर्च केला. जो पैसा सर्व सामान्य जनतेचा आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे.

छ. संभाजीनगर : 29 सप्टेंबर 2023 | भारत गंभीर संकटात सापडला आहे. लोकशाहीचे चार ही स्तंभ अडचणीत आहेत. त्यांच्यावर मोठा दबाव आहे. संसद भवनात तिरस्कार आणि शिवीगाळ सुरू आहे. देशात हिंसाचाराचे वातावरण पसरविले जात आहे. शिवीगाळ करणाऱ्या खासदारावर अद्याप कारवाई नाही. बेरोजगारी वाढत आहे. देशात 48 टक्के बेरोजगारी वाढली आहे. भारताच्या दोन बाजू आहेत. एक चमकता आणि दुसरा तरसता भारत असे सध्या पाहावयास मिळत आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. दसऱ्यानंतर इंडियाची देशभरात यात्रा सुरू होईल. प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल आणि ते तयार असतील तर ते इंडियात येतील. असे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Sep 30, 2023 11:41 PM
‘त्यांची उतरती कळा, उतावळापणा करणे योग्य नाही,’ ठाकरे गटाच्या नेत्याची नेमकी टीका कुणावर?
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, म्हणाल्या ‘मराठी आमचा धंदा, निवडून द्या यंदा’