Chandrashekhar Bawankule | आमदार नाराज तर मग उद्धव ठाकरे घरी का? बावनकुळे यांनी काढला चिमटा

| Updated on: Aug 25, 2022 | 7:01 PM

Chandrashekhar Bawankule | आमदार नाराज असतील तर मग उद्धव ठाकरे घरी का? असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या विकासाचे मुद्दे समोर घेण्याचे विरोधकांना आवाहन केले आहे.

Chandrashekhar Bawankule | 50 खोके, एकदम ओक्के, या विरोधकांच्या दबावतंत्रामुळे सरकारची नाकेबंदी झाल्याचे चित्र आहे. विरोधक दररोज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सरकारची प्रतिमा (Government Image) मलिन करण्यासाठीच विरोधकांनी हा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप केला आहे. वैयक्तिक जीवनाबद्दल पुरावे नसताना नाहक बदनामी करत आहे, ते योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकार गेल्याने विरोधक निराश असल्याचा टोला ही त्यांनी लगावला. आमदारांच्या (MLA Personal Comments) व्यक्तिगत जीवनावर टीकाटिप्पणी करु नये असेही त्यांनी म्हटले आहे. आमदार नाराज असतील तर मग उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) घरी का? असा सवाल करत विरोधकांनी नैराश्येतून बाहेर येत विकासाच्या मुद्यावर आक्रमक व्हाव, विधायक भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Aug 25, 2022 07:01 PM
Bhaskar Jadhav On Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; गडकरीच जबाबदार, भास्कर जाधव यांचा आरोप
Nitesh Rane : यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांवरील विघ्न दूर, कोकणातील रस्त्याचा प्रश्न लागणार मार्गी