मला पक्षानं तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना, रवींद्र धंगेकर यांचे चॅलेंज
पुणे कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीत इतिहास घडविणारे आमदार रविंद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असून पक्षाने जर संधी दिली तर आपण ही निवडणूक पुणेकरांच्या आशीर्वादाने नक्कीच जिंकू मग समोेर कोणताही उमेदवार का असेना असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे | 24 फेब्रुवारी 2024 : पुणे लोकसभा निवडणूकांवरुन राजकारण तापले आहे. या आपल्याला पक्षानं जर उमेदवारी दिली तर आपण निवडून येणारच मग भाजपाने कोणताही उमेदवार उभा करावा असे चॅलेंज कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले आहे. गेल्यावेळी चंद्रकांत दादांनी चुक केली होती. आता भाजपाचे जगदीश मुळीक तिच चुक करीत आहेत. कुणालाही कमी लेखू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. पुणेकरांना यंदा पाण्याचा साठा कमी असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते. परंतू कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत आम्ही अजितदादांना भेटून विनंती केली आहे, त्यामुळे तूर्त तरी पुणेकरांची पाणी कपात टळली असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले. पुण्याच्या ड्रग्जचा साठा परदेशात जाणार होता. त्याचे गुन्हेगार जरी परदेशात पळून गेले असले तरी ते केव्हा तरी सापडतील. त्यांचे पाठीराखे इथेच आहेत ना मग त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.