जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम

| Updated on: Nov 03, 2024 | 3:16 PM

महाविकास आघाडीचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी लाडकी बहीण सारख्या योजना बंद करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते जनतेच्या विरोधात आहेत. याचे नेते राहुल गांधी परदेशात आरक्षण बंद करणार असे सांगत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली आहे.

Follow us on

महायुतीत काही उमेदवारांनी नाराज होऊन अर्ज भरले आहेत. त्यांची समजूत काढण्यात येणार आहे. 99 टक्के उमेदवार अर्ज मागे घेतील. जे उमेदवार ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.अशा न ऐकणाऱ्या उमेदवारांना सहा वर्षे भाजपाची दारे बंद होतील असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नथुरामवरुन संघावर टीका केली आहे.या संदर्भात विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड विषारी झाले आहेत. आपले मतदारांना खूष करण्यासाठी त्यांना संघावर टीका करावीच लागते असेही बावळकुळे यांनी म्हटले आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे ते भाजपावर टीका करीत आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.