नवीन पक्ष बनविला नाही तर मग तुम्ही आहात कोण? कोर्टाचा सवाल
आम्ही एकाच पक्षातला दुसरा गट आहोत अशावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे चिन्ह नेमके कोणाजवळ असेल हे स्पस्ट करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो.
उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावर तुम्ही दुसरा पक्ष स्थापन केलेला नाही आणि दुसऱ्या पक्षात विलीनही झालेले नाहीत मग तुम्ही नेमके आहेत कोण असा प्रश्न कोर्टाने हरीश साळवे यांच्या मार्फत शिंदे गटाला विचारला आहे. तसेच तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेला होतात असा प्रश्नही कोर्टाने विचारला आहे. यावर युक्तिवाद करताना साळवे म्हणाले की, आम्ही एकाच पक्षातला दुसरा गट आहोत अशावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे चिन्ह नेमके कोणाजवळ असेल हे स्पस्ट करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. अपात्रतेनंतर आता चिन्हांवरून युक्तिवादाला सुरवात झाली आहे.
Published on: Aug 03, 2022 01:58 PM