मला संधी दिली तर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी देणार, नीलेश लंके यांची घोषणा

| Updated on: Apr 01, 2024 | 6:18 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटात परतलेले पहिले आमदार निलेश लंके यांना नगर दक्षिण लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. निलेश लंके यांनी आपल्या प्रचारासाठी पाथर्डीच्या मोहाटादेवीच्या दर्शनानंतर 'जनसंवाद' यात्रेला सुरुवात केली आहे.

अजितदादांची साथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटात परत येणारे पहिले आमदार ठरलेले निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेला आजपासून पाथर्डी येथून सुरुवात झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने निलेश लंके यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. पाथर्डीच्या मोहटादेवीचे दर्शन घेऊन निलेश लंकेच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ झाला आहे. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांना खासदार करण्याचा निर्णय शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी घेतला होता. ते ज्या आधी ज्या पक्षात होते, तेथील नेत्याचीही त्यांना खासदार करण्याची इच्छा होती. आता जनतेने मला निवडून दिले तर प्रत्येक तालुक्यात एक एमआयडीसी आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. आता आपली स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 01, 2024 06:16 PM
नाना पटोले नेमके कुणाचे? आंबेडकरांच्या शंकेवर पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, योग्य वेळी …
महायुतीच्या 4 जागांवर तोडगा निघाला?, कल्याण-ठाण्यातून कोण? संभाजीनगरमधून तिकीट कुणाला?