Beed हत्येचा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, या खासदाराने केली मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देखमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्याची तुलना बिहारशी होत आहे. या जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढल्याविषयी सर्वच जण बोलत आहेत. या संदर्भात आता या प्रकरणातील सर्वांचे सीडीआर तपासण्याची मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यातील ढासळत्या कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ही हत्या व्यवहारातून झाली यात तथ्य असले तरी संतोष देशमुख यांच्या हत्येत व्यवहार नव्हता असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जर खरा तपास करायचा असेल तर ज्या दिवशी 6 तारखेला कोणाचा फोन आला. ही पोलीस स्टेशनच्या पीएसआयची सीडीआर काढा, 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतक सरपंचाच्या भावाला कोणा-कोणाचे फोन आले, पोलीस स्टेशनला कोण-कोण बोलले?, तेथे बनसोड नावाचे पीआय आहेत त्यांना कोणाचा फोन आला, महाजन साहेबांना कोणाचा फोन आला? पाटील कोणाच्या संपर्कात होते. या तिघांचे पण सीडीआर काढा ? या आरोपींना जामीन झाला. आरोपींसोबत पोलीस दिसत आहेत याचे व्हिडीओ व्हायरल झालेत..सर्व चॅनलवर दिसत आहेत. सरपंचाच्या भावाशी हॉटेलमध्ये कोणी संवाद साधला हे सर्व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, सर्वाचे सीडीआर तपासा अशीही मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे.