‘ताकद बघायचीच असेल तर…’, ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदे गटाला ललकारलं
मेळाव्याच्या नियोजनाबाबत उद्याच्या सामनातून सूचना केल्या जातील. आझाद मैदानावर होईल तो इव्हेंट असेल. उद्याची गर्दी पाहून कोणाचा मेळावा आहे ते कळेल. मेळावा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पण, ताकदच बघायची असेल तर...
मुंबई | 22 ऑक्टोंबर 2023 : दसरा मेळावा हा आमच्यासाठी मोठा असतो. कार्यकर्ते आणि मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी वाहतूक व्यवस्था, पाणी, शौचालय या सगळ्यांची व्यवस्था केली. मेळावा शांततेत पार पडावा याबाबत पोलिसांसोबत समन्वय साधला आहे. मेळाव्याच्या नियोजनाबाबत उद्याच्या सामनातून सूचना केल्या जातील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली. आझाद मैदानावर होईल तो इव्हेंट असेल. दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल. कारण त्याला परंपरा आहे ठाकरेंची. शिवसेना ही मर्दांची आहे, असं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्याची गर्दी पाहून कोणाचा मेळावा आहे ते कळेल, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. मेळावा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तो त्यांनी घ्यावा. पण, ताकदच बघायची असेल तर निवडणुका घ्या असे आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिले.
Published on: Oct 22, 2023 11:46 PM