विदर्भात निसर्ग कोपला, चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी शिरले

| Updated on: Jul 21, 2024 | 5:11 PM

मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसेच विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावासाने जुलै महिन्याची सरासरी कालच ओलांडली आहे. येत्या तीन दिवस असाच पाऊस कोसळ्याचा अंदाज वेध शाळेने व्यक्त केला आहे.

Follow us on

विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि कोकण तटवर्ती भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. विदर्भातील चिचपल्ली गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. कारण गावातील गाव तलाव फुटल्याने गावातील 100 ते 150 घरात पाणी गेले आहे. आयएमडीने इशारा दिला आहे की येत्या तीन ते चार दिवस मुंबई, कोकण आणि विदर्भात असाच पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले आहे. समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र तयार झाल्याने हा पाऊस कोसळत आहे. या पावसाने चंद्रपूरातील अंधारी नदीतील पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 गावकऱ्यांची सुटका रेस्क्यू ऑपरेशन राबवून अग्निशमन आणि पोलिसांनी केली आहे. या नदीचा प्रचंड पूर आल्याने हे गावकरी शेतात अडकले होते.