King of Lalbagh : लालबागच्या राजाचे विसर्जन, मूर्तीवर पुष्पवृष्टी, गुलालाची उधळण

| Updated on: Sep 09, 2022 | 6:25 PM

भक्तगण दर्शनासाठी थांबलेले होते. हजारोच्या संख्येनं लोकं जमलेले होते. गणेशाचं रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद भाविकांनी घातली.

मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची शान पाहायला मिळाली. लालबागच्या राजाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी तसेच गुलालाची उधळण करण्यात आली. फटाक्यांची आतिशबाजीसुद्धा झाली. मिरवणुकीमध्ये लालबागचा राजा आणि एंटाफीलचा राजा यांची भेट झाली. हा अनोखा क्षण अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. विसर्जन मिरवणुकीत भक्तांची मोठी संख्या होती. भक्तगण दर्शनासाठी थांबलेले होते. हजारोच्या संख्येनं लोकं जमलेले होते. गणेशाचं रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद भाविकांनी घातली.

Published on: Sep 09, 2022 06:25 PM
आनंद दिघेंनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील देवीच्या मंडपाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन
Ganpati Visarjan : गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी, कसा आहे पोलीस बंदोबस्त?