Tv9 मराठी’च्या बातमीचा इम्पॅक्ट ! 12 तासात यंत्रणा कामाला, खड्डे बुजवण्यास सुरुवात!

| Updated on: Aug 07, 2023 | 8:09 AM

मुसळधार पावसामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान सातारा हद्दीतील चाहूर परिसरातील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत.

सातारा, 07 ऑगस्ट, 2023 | मुसळधार पावसामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान सातारा हद्दीतील चाहूर परिसरातील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. शनिवारी या महामार्गावर एकाच रात्रीत तब्बल 15 हून अधिक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.या घटनेची बातमी टीव्ही 9 मराठी ने प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या बारा तासातच या भागातील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली.

Published on: Aug 07, 2023 08:09 AM
‘TV9 मराठी’ इम्पॅक्ट ! बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग, नंदुरबारच्या दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा
शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात; ताफ्यातील पोलीस व्हॅनची कारला मागून धडक, किरकोळ दुखापत