इम्तियाज जलील यांनी ठाकरेंवर निशाणा, यासह पहा इतर अपडेट 25 महत्वाच्या बातम्यामध्ये
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी जलील यांनी, जे लोक औरंगाबादच्या नामांतरणाचे राजकारण करत होते. त्याच्याच पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं अशी टीका त्यांनी केली.
निवडणूक आयोगाने शिंदेगटाला नवीन नाव आणि चिन्ह काल दिलं. त्यानंतर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया दिली. त्यांनी शिंदे गटाला देण्यात आलेलं ढाल-तलवार हे चिन्ह मराठमोळ आहे. तर ढाल-तलवार या चिन्हाला गद्दार म्हणणं हिच मोठी गद्दारी असल्याचा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. यावेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी जलील यांनी, जे लोक औरंगाबादच्या नामांतरणाचे राजकारण करत होते. त्याच्याच पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं अशी टीका त्यांनी केली. तर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या नावावरून ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता फार धुसर आहे. कारण न्यायालयाच्या आजच्या कामकाजात हे प्रकरणच नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यादरम्यान एकनाथ खडसे यांनी, राजकीय पक्षांचा इतिहास हा कधी संपत नसतो असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचा देखिल इतिहास कधी संपणार नाही असेही म्हटलं आहे.