एकनाथ खडसेंची महाजनांवर टीका, पहा काय म्हणाले खडसे, यासह इतर बातम्या पहा 25 महत्वाच्या बातम्या

| Updated on: Oct 15, 2022 | 8:14 PM

परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान राज्यात झालं आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळासह नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर औरंगाबाद येथे राज्यातील नुकसान भरपाईचे पंचनामे झाले की, सरकार भरपाईबाबत निर्णय घेईल अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

जळगावचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याचे संकेत मिळत आहेत. जळगावात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन पुन्हा एकदा आमने- सामने येण्याची चिन्ह दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी महाजनांवर टीका करताना आपल्याला त्यांच्याप्रमाणे नौटंकी करायला आपल्याला जमत नाही असं म्हटलं आहे. तर जळगाव जिल्हा दुध संघाच्या कथित घोटाळ्यावरून आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे. तसेच त्यांनी खडसे यांनी सर्व सभासदांसोमप आपल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असे ते म्हणालेत. तर खडसेंनी प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकार थांबत आहे. तर मग त्यांनी केलेली बेकायदेशीर दुरूस्ती सरकारनं रद्द करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजी शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे. तर परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान राज्यात झालं आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळासह नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर औरंगाबाद येथे राज्यातील नुकसान भरपाईचे पंचनामे झाले की, सरकार भरपाईबाबत निर्णय घेईल अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

Published on: Oct 15, 2022 08:14 PM
सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही. आमचं सरकार राज्यात पुन्हा येईल- फडणवीस असं का म्हणाले? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे कोणता गेम आखत आहेत? पहा काय आहे प्लॅन टॉप 9 न्यूजमध्ये