अजित पवार यांच्या बंडानंतर इम्तियाज जलील यांचं जनतेला आवाहन, “आता तरी विचार करा…”

| Updated on: Jul 05, 2023 | 12:43 PM

अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.

औरंगाबाद : अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. इम्तियाज जलील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही व्हिडीओ दखवत टीका केली आहे. इम्तियाज जलील नेमकं काय बोलले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…

Published on: Jul 05, 2023 12:43 PM
ठाकरे बंधूनी एकत्र यावेत यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी वाढली; आता मुंबईबाहेर लागले बॅनर्स
अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचे थेट आरोप? आरोपानंतर एकच खळबळ