Special Report | उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर एक्सक्लूझीव्ह रिपोर्ट
शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना मोठं केलं.पण आता शिवसेना नावाच्या आईलाच गिळतायत, अशी जहरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय. तसंच शिंदे गटाला ठाकरेंनी सडलेल्या पानांची उपमा दिलीय.
मुंबई : संजय राऊतांना(Sanjay Raut) दिलेल्या मुलाखतीतून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Shiv Sena chief Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर(Chief Minister Eknath Shinde) अक्षरश: तुटून पडले. शिंदेंमुळंच शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळं स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदेंच आहेत. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना मोठं केलं.पण आता शिवसेना नावाच्या आईलाच गिळतायत, अशी जहरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय. तसंच शिंदे गटाला ठाकरेंनी सडलेल्या पानांची उपमा दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:च्या गटालाच शिवसेना म्हणतायत. निवडणूक आयोगाकडे त्यांनी धनुष्यबाण चिन्हावरही दावा केलाय. मात्र शिंदेंची आता शिवसेना प्रमुख व्हायची राक्षसी महत्वाकांक्षा असल्याचा घणाघातही ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर, फडणवीसांनी बोचरी टीका केलीय. संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचं फडणवीस म्हणालेत. आजारपणात माझी हालचाल थांबली होती, त्यावेळी शिवसेना फोडण्यासाठी शिंदेंची हालचाल सुरु होती असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. त्या टीकेला मनसेनंही प्रत्युत्तर दिलंय. अमित ठाकरेंही आजारी असतानाच शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडले, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय…