आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, केला गेला की करवला गेला, विरोधी पक्षाचा आरोप काय ?

| Updated on: Feb 08, 2023 | 8:15 AM

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना असा हल्ला होणे निश्चित अयोग्य आहे. महाराष्ट्र पोलीस याची दाखल घेऊन योग्य ती कारवाई करतीलच. पण हा हल्ला..

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल रात्री अज्ञात इसमांकडून हल्ला झाला. शिवसंवाद यात्रेसाठी औरंगाबाद येथे आदित्य ठाकरे आले होते. ही सभा संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या दिशेने एक दगड आला. त्यानंतर आणखी काही दगड आले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत आहे. त्यामुळे काही समाजकंटक मुद्दाम असे प्रकार घडवीत आहेत. या समाजकंटकांकडून रमेश बोरनारे यांच्या नावाच्या घोषणा सुरु होत्या. दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना असा हल्ला होणे निश्चित अयोग्य आहे. महाराष्ट्र पोलीस याची दाखल घेऊन योग्य ती कारवाई करतीलच. पण हा हल्ला झाला, केला गेला की करवला गेला याची चौकशी व्हावी. आदित्य यांना सुरक्षा पुरविली जावी असेही ते म्हणाले.

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली; पाच वर्षानंतर लोअर परेल पूल वाहतुकीसाठी खुला होणार
शेतकऱ्याने तक्रार केली, गुलाबराव पाटलांनी त्याच्याच गाडीवर बसून शेत गाठलं अन् निकाल लावला…