लिलाव करून त्यांनी थेट पदेच विकली, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती साठी निवडणूक जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी निवडणूक न घेता जो जास्त बोली लावेल त्यालाच निवडून देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.
औरंगाबाद : सरपंच, उपसरपंच आणि सदस्य होण्यासाठी गावकऱ्यांनीच जो जास्त बोली लावेल त्याला निवडून आणण्याचे जाहीर पत्रक काढले. गावातील ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आता करण्यात येत आहे.
औरंगाबाद येथील शेलुद गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावकऱ्यांनी लिलाव करत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकली. हि बोली लावण्यासाठी सर्व गावकरी मंदिरात जमा झाले होते. यावेळी सरपंच पदासाठी १४.५० लाख तर उपसरपंच पदासाठी ४ लाखांची बोली लावण्यात आली होती. सदस्य पदासाठी ७० हजार ते २ लाखांपर्यंत बोली लावली गेली.
Published on: Jan 29, 2023 12:23 PM