Beed: बीडमध्ये पहिल्याच पावसात पूल पडल्याने गावांचा संपर्क तुटला
निकृष्ट दर्जाचं काम रोखण्याचा प्रयत्नही आम्ही केला होता. याबरोबरच तहसीलदार , कलेक्टर यांच्याकडेही आम्ही तक्रार केली होती मात्र याची कुठेही दाखल घेण्यात आलेली नाही . आता माणसे वाहून गेल्यावर शासन दाखल घेणारा का अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.
बीड – राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाला सुरुवात होताच बीडमधील(Beed) विकास कामांची दयनीयस्थिती समोर आली आहे. पहिल्या पावसातच बीडमधील पूल पडला आहे. पूल पडल्याने जवळपास 13 गावांचा( villages) संपर्क सुटल्याचे समोर आले आहे. संबधीवत घटनेबाबत लोकप्रतिनिधीना सांगूनही आद्यपही दुरुस्तीच काम हाती घेण्यात आले आहे. पुलाचे ( bridge)निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचं काम रोखण्याचा प्रयत्नही आम्ही केला होता. याबरोबरच तहसीलदार , कलेक्टर यांच्याकडेही आम्ही तक्रार केली होती मात्र याची कुठेही दाखल घेण्यात आलेली नाही . आता माणसे वाहून गेल्यावर शासन दाखल घेणारा का अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Published on: Jun 20, 2022 06:09 PM