नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेली; चंद्रपूरमधील थराराक व्हिडिओ

| Updated on: Jul 17, 2022 | 4:43 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला महापूर आला आहे. गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहतोय, पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून जावे लागते. शेतशिवारात, गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी आहे रखडली, हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो, शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैल जोडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना बैलगाडी  वाहून गेली.

चंद्रपूर : नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला महापूर आला आहे. गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहतोय, पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून जावे लागते. शेतशिवारात, गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी आहे रखडली, हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो, शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैल जोडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना बैलगाडी  वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे वाचले प्राण, गहिनीनाथ वराटे असे वाचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही साध्या-साध्या दळणवळणाच्या समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

 

 

Anil Bonde on Sanjay Raut | कोणी केला शिवसेना घात? काय म्हणाले अनिल बोंडे? कोणावर केली बोंडेंनी घणाघाती टिका
…म्हणून धनंजय मुंडेंनी स्वतःच फेटा बांधून घेतला; व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल