भाजप नेत्याचा आदेश, म्हणाला अजित पवार यांना द्या ४४० चा करंट, पुन्हा नाव…

| Updated on: Feb 17, 2023 | 9:22 AM

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात या निवडणुकीत प्रमुख लढत होत आहे.

पुणे : चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आधी राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा मतदारसंघ भाजपाकडे आला. मात्र, लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात या निवडणुकीत प्रमुख लढत होत आहे. या मतदार संघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तळ ठोकून आहेत. त्यांनी मतदारसंघात मॅरेथान दौरे सुरु केले आहेत. या प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी २६ तारखेला इतक्या जोरात बटन दाबा की अजित पवार यांना ४४० चा करंट लागला पाहिजे. पुन्हा त्यांनी चिंचवडचे नाव घेता कामा नये अशी टीका केली आहे.

Published on: Feb 17, 2023 09:22 AM
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे जाणार? आज होणार फैसला
शाळेत स्नेह संमेलनासाठी गेला, पण पोहोचला पोलिसांच्या वर्गात, मग त्यांनी असा धडा शिकविला की…