CM Eknath Shinde :’ लोकशाहीत बहुमत आणि नंबरला महत्व! आम्ही नियमाप्रमाणे सरकार स्थापन केलं’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमटोला, सरकार स्थापनेसाठी दिला कायद्याचा हवाला
CM Shinde News : लोकशाहीत बहुमत आणि नंबरला महत्व असतं असा सूचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला
Shinde On Democracy : ‘लोकशाहीत बहुमत आणि नंबरला अनन्यसाधारण महत्व असते, आम्ही नियमांप्रमाणे सरकार स्थापन केलं आहे’, असा भीमटोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला. देशात राज्य घटना आहे, कायदा आणि नियम पण आहेत, याचे त्यांनी स्मरण करुन दिलं. याच्या बाहेर जाता येत नाही, या नियमांना क्रॉस करुन आम्ही ही गेलो नसल्याचे सांगत, आम्ही नियमाप्रमाणे काम केले. नियमाप्रमाणे सरकार स्थापन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. दिल्ली दौ-या (Delhi Visit) दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या दौ-याचे प्रयोजन आणि इतर अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. ही गद्दारी नसून उठाव असल्याचे ही ते सांगायला विसरले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी चेंडू टोलावला कोर्टाकडे
सरकारची स्थापना आणि विधानसभा अध्यक्षांची निवड ही चुकीच्या पद्धतीने आणि नियमबाह्यपणे केल्याची ओरड होत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता, हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित (issue is pending in court) असल्याने त्याविषयी कुठलंही भाष्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळलं. पण पुढं एकूणच सरकार स्थापन करण्याची कवायत पुर्णतः नियमांप्रमाणे केल्याचे ही ते सांगायला विसरले नाहीत.