‘केंद्र सरकारची XXX आहे, त्यामुळेच त्यांनी….’ विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली
मराठा आरक्षणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर, इंडियाला 'घमेंडीया' नाव देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
बुलढाणा : 6 सप्टेंबर 2023 | ज्या वेळी मराठा आरक्षणावर मार्ग काढायचा होता, तेव्हा सरकार झोपले होते. लोकांचे पक्ष फोडत होते. लोकांचे कपडे फाडत होते. लोकांना जेलमध्ये टाकत होते. या सरकारने सव्वा वर्ष काय केलं? केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असताना आरक्षण का दिले नाही असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. Ews चा कायदा करून आरक्षण दिले असते तर मराठा समाजासाठी कायदा करता आला असता. सरकार फक्त बोळवण करण्याचे काम करत आहे. मराठा आरक्षण देण्याची सरकारची नियत असेल तर तातडीने अधिवेशन बोलवा अशी मागणीही त्यांनी केली. इंडिया आघाडीला प्रेसिडेंट भारत नाव दिल्यामुळे केंद्र सरकारची फाटली आहे. त्यामुळेच त्यांनी इंडियाचा धसका घेतला आहे. इंडियाला ‘घमेंडीया’ नाव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. केंद्र सरकार इंडियाचा भारत करत आहे. मात्र, त्याआधी व्यवस्था बदला. इंडिया सुखी समृद्ध हवा आहे, तो इंडिया दाखवा अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.